|Monday, January 27, 2020
You are here: Home » Automobiles » बजाजची ‘चेतक’ 14 जानेवारीला होणार लाँच

बजाजची ‘चेतक’ 14 जानेवारीला होणार लाँच 

 ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी ‘बजाज’ची बहुप्रतिक्षित ‘चेतक’ ही इलेक्ट्रिक स्कूटर येत्या 14 जानेवारीला लाँच होणार आहे.

बजाजच्या ‘चेतक’ या स्कूटरने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. तीच स्कूटर आता बजाज नव्या रुपात, नव्या ढंगात आणि इलेक्ट्रिकमध्ये लाँच करत आहे. चेतक स्कूटर इलेक्ट्रिक ब्रन्ड अर्बनाईट अंतर्गत सादर करण्यात आली आहे. स्कूटरचा लूक प्रीमियम आहे. रेट्रो लूक असणाऱया स्कूटरमध्ये कर्वी बॉडीवर्क, मल्टी स्पोक अलॉय व्हिल्स, स्विचगिअर, फुल एचडी लाइटिंग आणि डिजीटल कंसोल आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 95 किमी पर्यंत अंतर कापणार आहे.

पुण्यातून या स्कूटरच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर बेंगळूर आणि इतर मेट्रो शहरात या स्कूटरची विक्री होईल. बजाजने ही स्कूटर 16 ऑक्टोबरला सादर केली होती. या स्कूटरची अंदाजे किंमत 1 लाख 20 हजार रुपये असणार आहे.

Related posts: