|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गॅस गळतीमुळे आग

गॅस गळतीमुळे आग 

प्रतिनिधी / कराड :

घरातील गॅस सिलिंडरला गळती लागल्याने आग लागल्याची घटना मलकापूर (ता. कराड) येथील शिवदर्शन कॉलनीत घडली. रविवारी पहाटे लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे लाखाचे नुकसान झाले. याप्रकरणी दीपक श्रीपती जाधव यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दीपक जाधव हे कुटुंबासह शिवदर्शन कॉलनीतील वैभव निवास येथे राहतात. त्यांच्या घरातील एच. पी. कंपनीचा गॅस सिलिंडर शनिवारी संपला होता. त्यामुळे त्यांनी नवीन गॅस सिलिंडर जोडून घेतला. नव्याने जोडलेल्या सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आले. जाधव यांनी एच. पी. गॅस एजन्सी पालकर यांच्याकडे तक्रार केली. एजन्सीचे लोक जाधव यांच्याकडे आले. त्यांनी सिलिंडर पुन्हा जोडून दिला. रविवारी पहाटे जाधव यांच्या पत्नी रुपाली यांनी जेवण तयार करण्यासाठी गॅस सुरू केल्यावर अचानक भडका झाला. त्यांनी आरडाओरडा करत तत्काळ बाहेर धाव घेतली. अवघ्या पाच मिनिटात आग घरभर पसरली. आगीत एलईडी टीव्ही, धान्य, कपडे यासह संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे लाखाचे नुकसान झाले. आग सुरू असताना जाधव यांचे शेजारी विकास पाटील, प्रसाद रसाळ यांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.

Related posts: