|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजी पाटो येथील कचरा प्रकल्पाला आग

पणजी पाटो येथील कचरा प्रकल्पाला आग 

प्रतिनिधी / पणजी :

पणजी पाटो येथे असलेल्या कचरा प्रकल्पाला रविवारी रात्री आग लागली. अग्निशामक दालाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला. आग इतकी प्रचंड होती की दलाच्या जवानानी सोमवारी पहाटे आग विजविण्यास सुरुवात केली होती, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आग विजवण्याचे काम सुरु होते.

आग नक्की कशी लागली त्याची ठोस माहिती मिळाली नसली तरी अग्निशामक दलाच्या अंदाजानुसार रविवारी रात्री प्रकल्पाच्या जवळच कुणीतरी आग घातली असावी नंतर ती आग प्रकल्पाजवळ असलेल्या जेसीबी यंत्राला लागली आणि नंतर ती आग कऱयापर्यंत पोचली. कचऱयात लाकडाचा मोठा भुसा होता, त्याला आगीने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. प्रकल्पाचे छप्पर, जेसीबी व प्रकल्पाचे काही सामानही आगीत जळून खाक झाले आहे.

पाणी विभागाकडून योग्य सहकार्य नाही

आग विजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून अग्निशामक दलाला पाण्याची कमतरता भासली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पाण्यासाठी म्हणावे तसे सहकार्य अग्निशामक दलाला मिळत नव्हते. शेवटी मनपानेच पाण्याची व्यवस्था केली असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले.

आगीबाबतची माहिती महापौर उदय मडकईकर तसेच मनपाचे आयुक्त संजित रॉड्रीग्ज यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. अग्निशामक दलाच्या जवानाबरोबरच मनपाच्या कामगारांनीही काही सुरक्षित असलेले सामान बाहेर काढले.

प्रकल्पाचा सुरक्षारक्षक रात्रीपासून बेपत्ता

आगीची घटना घडली तेव्हा प्रकल्पाकडे असलेला सुरक्षा रक्षक गायब झाल्याचे दिसून आले होते. आगीच्या घटनेबाबत पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहेत. आग लागण्याचे नेमके कारण काय याबाबत पोलीस तपास करणार आहेत. नुकसान नक्की किती झाले ते अद्याप कळलेले नाही.

प्रकल्पात आठ महिन्यांपासूनचा होता कचरा

दर दिवसाला 25 ते 30 टन कचरा या प्रकल्पात येत असतो. गेल्या एक ते दीड महिन्याचा कचरा येथे होता. त्यातच गेल्या काही दिवसांत पणजीत मोठमोठे कार्यक्रम झाले असल्याने कचर मोठय़ाप्रमाणात वाढला होता. त्याला आग लागली असून आग आतपर्यंत पोचली असल्याचे दिसून येत आहे. ही आग पूर्णपणे विजवली नाही तर ती आग पुन्हा कधीही भडका घेऊ शकते. म्हणून आग पूर्ण विजविण्याचे आमचे प्रयत्न असतील असे रॉड्रीग्ज यांनी सांगितले. कचरा नियमितपणे गोळा करण्याचे काम सुरु राहणार असून लोकांनी काळजी करण्याची गरज नाही, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

 

Related posts: