|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा आविष्कार

भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा आविष्कार 

प्रतिनिधी / पणजी :

कांपाल येथील मैदानावर काल सोमवारी 72 व्या लष्कर दिनानिमित्त ‘तुमचे लष्कर जाणा’ यातून भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारा आविष्कार डोळय़ांचे पारणे फेढणारा ठरला. ‘नो युवर आर्मी’ उपक्रमांतर्गत आर्मी डॉग शो, मिलिटरी डिस्प्ले, जॅझ म्युझिक, सांस्कृतिक कार्यक्रम, चेतक हेलिकॉप्टरची उड्डाणे, मल्लखांब प्रात्यक्षिके, जीवाचा थरकाप उडविणाऱया कसरती या द्वारे जवांनांनी आपल्या सामर्थ्याचे दर्शन गोमंतकीयांना घडविले आणि त्यामुळे सर्वांचा उर देशाभिमानाने भरुन आला.

 आज दि. 14 रोजीही सकाळी 9.30 आणि सायं. 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय लष्काराद्दल अभिमान बाळगणाऱयांना लष्कराचे कौशल्य, सामर्थ्य, देशाभिमान अनुभवण्याची ही सुर्वणसंधी आहे.

श्रीपादभाऊंच्या सूचनेनुसार केले आयोजन

कार्यक्रमांच्या सुरुवातीस ब्रिगेडियर संजय रावळ यांनी सांगितले की, लष्करी जवान कशा परिस्थितीत काम करतात, कसे राहतात, कुठल्या †िठकाणी कसे वावरतात हे सर्व जनतेला कळावे या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी तशी इच्छा व्यक्त करुन असा कार्यक्रम गोव्यात व्हावा, अशी सूचना संरक्षण खात्याला केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमाचे महत्व ओळखून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पाठिंबा दिला, असेही त्यांनी सांगितले.

देशसेवा ही मोठी सेवा : ब्रिगेडियर रावळ

लष्करात भरती होणारे युवक हे आपल्या महत्वाच्या वयात भारतीय सेनेत भरती होतात. देशाच्या संरक्षणासाठी त्यांचे आयुष्य कसे असते हे यामधून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलांमध्ये, युवकांमध्ये देशाबद्दल अभिमान वाढावा. तसेच त्यांनी पुढे येऊन लष्करात सहभागी होऊन देशाची सेवा करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा. देशसेवा करणे म्हणजे महान सेवा आहे, असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांसाठी खास सेल्फी कॉर्नर

या मेळय़ातून भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी गोव्यातील अनेक विद्यालयांतील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुलांसाठी येथे सेल्फ्ढाr कॉर्नर ठेवण्यात आला आहे. लष्कराची शस्त्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या शस्त्रांची माहिती देण्यासाठी जवान तयार आहेत. त्यामुळे या स्थळाला भेट देणाऱया प्रत्येकाला युद्ध लढताना कोणत्या शस्त्रांचा, कसा वापर होतो, याची खरी माहिती मिळते.

Related posts: