|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » जेएनयू : हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे फोन जप्त करा : हायकोर्ट

जेएनयू : हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे फोन जप्त करा : हायकोर्ट 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 5 जानेवारीला झालेल्या हिंसाचार प्रकरणावर तीन प्रोफेसर अमित परमेश्वरन, अतुल सूद आणि शुक्ला विनायक सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली.

या सुनावणी दरम्यान, जेएनयू हिंसाचाराशी जोडलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपच्या सदस्यांना समन्स जारी करुन त्यांचे मोबाईल जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

हायकोर्टाने गुगल आणि व्हॉट्सऍपला सांगितले की, ते त्यांच्या धोरणानुसार, ईमेल आयडीच्या आधारावर ग्राहकांच्या मूलभूत माहितीच्या आधारे डेटा जतन करा. तसंच, पोलिसांनी मागवलेले सीसीटीव्ही फुटेज लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जेएनयूला कोर्टाने दिल्या आहेत.

 

Related posts: