|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » म्हासुर्ली शाखेतील जिल्हा बँक कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

म्हासुर्ली शाखेतील जिल्हा बँक कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

म्हासुर्ली/ वार्ताहर

म्हासुर्ली(ता. राधानगरी) येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी महादेव दादू चौगले (वय.५६) यांचे बँकेत कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. जिल्हा बँकेच्या म्हासुर्ली शाखेत ते शिपाई पदावर कार्यरत होते. आज, मंगळवार (दि.14) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुळचे म्हासुर्ली येथीलच रहिवाशी असलेले महादेव चौगले काही महिन्यापासून धामोड शाखेतून गावात बदली होऊन आले होते. आज दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास ते बँकेत दैनदिन काम कर असताना त्यांना खुर्चीतच चक्कर येऊन खाली कोळसले. यावेळी बँकेत असलेल्या शाखा अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी व नातेवाईकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच गावावर शोककळा पसरली. तसेच व्यापाऱ्यांनी व गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले.

विविध संस्थांचे संस्थापक व माजी सरपंच दगडू चौगले यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, दोन मुली, भावजयी, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Related posts: