|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » स्टेट बँकेची ठेवींवरील व्याजदरात कपात

स्टेट बँकेची ठेवींवरील व्याजदरात कपात 

नवी दिल्ली

 सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असणाऱया स्टेट बँकेने ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर आता 0.15 टक्के (15 बेसिस पॉईंटस्) व्याज कमी मिळणार आहे. 1 ते 10 वर्षे कालावधी असणाऱया ठेवींना नवे व्याजदर लागू होतील. नवे दर 10 जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती स्टंट बँकेच्या वतीने देण्यात आली.

नवे व्याजदर आणि त्यासंबंधीची माहिती स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. दोन कोटी पेक्षा कमी रकमेच्या 1 ते 10 वर्षे कालावधीच्या सर्व ठेवींवर आता 6.25 टक्क्यांऐवजी 6.10 टक्के व्याज मिळणार आहे. नवे व्याजदर नव्या ठेवींवर लागू होणार आहेत.  

Related posts: