|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नगर परिषदांमध्ये आता वनीकरण मोहीम

नगर परिषदांमध्ये आता वनीकरण मोहीम 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेश

 प्रतिनिधी/  रत्नागरी

शहरीकरण आणि अन्य विकासात्मक कामांमुळे मोठय़ा प्रमाणात जंगलतोड होत असल्याने पर्यावरणाचा ऱहास होते. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी  नगर परिषदांनी  नागरी वनीकरण कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

कोकणातील नगर परिषद मुख्याधिकाऱयांची नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली. या बैठकीला रत्नागिरी जिह्यातील नगर परिषद व नगर पंचायती यांचे सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याधिकाऱयांकडून सरकारच्या विशेष अपेक्षा आहेत. त्यांना नेमून देण्यात आलेली कामे योग्यप्रकारे पार पाडावीत. स्वच्छतेचे मुद्दे अग्रक्रमाने मार्गी लावावेत. नागरिकांना छोटय़ा कामांसाठी नगर परिषदांमध्ये हेलपाटे मारवे लागू नयेत यासाठी ठराविक मुदतीत कामे पुर्ण करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणविषय अनेक सूचना आग्रहपूर्वक मांडल्या. यापुढे नागरी वनीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे व ही झाडे जगली पाहिजेत. त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱयांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पर्यावरण संतुलनासाठी शहरांमध्ये झाडांची संख्या वाढणे आवश्यक असून नागरी वनीकरण मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. गेल्या 5 वर्षात स्वच्छता मोहीम नगर परिषदांनी चांगल्या प्रकारे पार पाडली आता नागरी वनीकरण मोहिमही ताकदीने राबवावी अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केल्या.

Related posts: