|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्त्रियांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी

स्त्रियांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर /

समाजात सर्वच जाती-धर्मातील स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. स्त्रियांच्या अस्तित्वाचे बाजारीकरण केले जात आहे. त्यामुळे स्त्रियांनी सौदर्यांबरोबरच आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवावी. तरच समाजात त्यांना मानाचे स्थान मिळेल, असे प्रतिपादन ऍड. असीम सरोदे यांनी केले.

आरती फाउंडेशन आयोजित आरती पाटील स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. समाजातील स्त्राr प्रतिमा, नेत्यांची वक्तव्ये व अन्यायाची प्रक्रिया या विषयावर त्यांनी भाष्य केले. कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1871 ला संमत केला. तरीही आजच्या घडीला हुंडा देणे-घेणे चालू आहे. हा कायद्याने गुन्हा आहे. सोन्याच्या गुलामगिरीतून स्त्रियांनी बाहेर पडले पाहिजे. तसेच समाजामधील सोन्याचे महत्त्व कमी होत नाही तोपर्यंत समाजातील महिलांवरील अत्याचारही कमी होणार नाहीत. सौंदर्याचे बाजारीकरण चालू आहे. यातून स्त्राrनी बाहेर पडावे. पण पुरुष प्रधान संस्कृतीत गुणवत्ता आणि कार्यकर्तृत्वापेक्षा सौंदर्य पाहीले जाते. पण सौंदर्यापेक्षा स्वभाव टिकून राहतो असे सरोदे यांनी स्पष्ट केले.

 ऍड. सरोदे म्हणाले, सध्या आकर्षक असलेल्या गोष्टी विकल्या जात आहेत. हुशारी देखील विकली जात आहे. स्त्रियांना एखाद्या चौकटीत बंदिस्त करणे आयोग्य आहे. समाजाने आपल्या विचारशैलीत बदल केला नाही तर कधीच सुधारणा होणार नाही.  मुलींनीही स्वकर्तुत्व सिद्ध करावे यासाठी प्रत्येक आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे समाज बदलत नाही. तर प्रत्येकाने बदल केला पाहिजे असेही ते म्हणाले.

ऍड. बी एम पाटील यांनी प्रास्ताविक केले., अंजली पवार यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी टी.बी.पाटील, ऍड. गजेंद्र सानप तसेच पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

 

Related posts: