|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » अरविंद केजरीवाल यांना व्यंकटेश्वर स्वामींचे आव्हान

अरविंद केजरीवाल यांना व्यंकटेश्वर स्वामींचे आव्हान 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात केवळ 9 रुपये कॅश जमा असलेल्या एका उमेदवाराने केजरीवाल यांना आव्हान दिले आहे. श्री व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक असं या उमेदवाराचं नाव असून त्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, स्वामींनी आतापर्यंत 16 निवडणुका लढल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश चा समावेश आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्वामी यांनी एकूण तीन नामांकन अर्ज भरले आहे. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि हिंदुस्तान जनता पार्टीकडून स्वामी यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. तसेच त्यांनी 10 हजार रुपये सिक्मयुरिटी सुद्धा जमा केली आहे.

तीन पक्षांकडून नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर स्वामी म्हणाले, मी आतापर्यंत समाजाची सेवा निस्वार्थ भावनेने केली आहे. आता दिल्लीत काम करण्याची इच्छा आहे. जर त्यांना (भाजपा) वाटत असेल की मी योग्य उमेदवार होऊ शकतो, तर मला विश्वास आहे की पार्टी माझे समर्थन करेल. तसेच, जर भाजपाने तिकीट दिले नाही तर त्या दोन पक्षांमधून कोण-ना-कोणतरी तिकिट आवश्य देईल.

 

Related posts: