|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे.

आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱयावर आहेत. मंगळवारी त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या मुख्यालयाला भेट देऊन तेथील कर्मचाऱयांशी गप्पा मारल्या. तर आज राहुल गांधींची भेट घेतली. दरम्यान अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

याआधी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

 

Related posts: