|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » नरंदेत विविध विकासकामांचा शुभारंभ

नरंदेत विविध विकासकामांचा शुभारंभ 

नरंदे /प्रतिनिधी

नरंदे ता. हातकणंगले येथील अनेक वर्ष्यापासून रखडलेल्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे गटनेते अरुणराव इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव भंडारी उपस्थित होते.

या विकासकामात नरंदे ते बनाकडे जाणार रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी इमारत बांधणे, पाण्याची टाकी दुरुस्त करणे, विद्या मंदिर वर्ग दुरुस्ती, मुख्य चौकात हायमॅक्स दिवा लावणे, मुस्लिम दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे, नवबौद्ध घटक रस्ता करणे यासाठी ४५ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच रवींद्र अनुसे, उपसरपंच अभिजित भंडारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी गत २ वर्ष्यात २ कोटींची विकासकामे पूर्ण केली तसेच 3 कोटी रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजुर केली.

यावेळी भूविकास बँकेचे माजी संचालक किरण इंगवले, उपअभियंता एम. डी. क्षीरसागर एन. के. कांबळे, नरंदेचे सरपंच रविंद्र अनुसे उपसरपंच अभिजित भंडारी, ग्रामपंचायत सदस्य संतोष भंडारी, विनोद भंडारी, सिकंदर मुल्लाणी, नामदेव पाटील, मेघा चौगुले, रेखा कदम, मंगल चौगुले, भाऊसो शेटे, रघुनाथ गिड्डे, रंगराव आवळे, महावीर चौगुले, ग्रामसेवक राजेंद्र भोपळे, बाळासो पाटील, बाबर एडवान, हरी अनुसे, सोमा अनुसे, आण्णा अनुसे,अवबा अनुसे, रावसो भोसले, खुद्दबुद्दीन मुल्लानी, राजू अनुसे, शहाजी भंडारी, दिलीप साळोखे, जहागीर मुल्लाणी, पोपट भंडारी, अमोल चौगुले, यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related posts: