|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच : भाजप नेते बरळले

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच : भाजप नेते बरळले 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता आणखी एका भाजप नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच समजायला हवा’, अशी मुक्ताफळं भाजप माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी उधळली आहेत. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते.

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादावर बोलत असताना हळवणकर यांनी मोदी आणि शिवाजी महाराजांच्या कामात साम्य असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो.

 

Related posts: