|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » झेडपीची पुन्हा निवडणूक लागणार

झेडपीची पुन्हा निवडणूक लागणार 

सोलापूर संवाद

प्रतिनिधी/सोलापूर

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून  आलेले (मोहिते-पाटील गटाचे) सहा सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. त्यांचे सदस्यत्त्व रद्द झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर अविश्वास ठराव आणणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांतर झेडपीत पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे, असा दावा झेडपी सदस्य उमेश पाटील यांनी केला आहे.

पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजपचे  बहुमत नाही. कारण येथे अपक्ष निवडून आलेल्या सदस्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे निवडणुकीत सदस्य पळवापळवी होत आहे. झेडपीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळी माळशिरस येथील शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील, स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, मंगल किरण वाघमोडे, सुनंदा बाळासाहेब फुले, अरुण बबन तोडकर, गणेश महादेव पाटील यांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपाला मतदान केल्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता गेली. मात्र त्यांचे सदस्यत्त्व रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येईल.

विषय समिती सभापती निवडीत महाविकास आघाडीचे चारपैकी तीन सदस्यांचा विषय झाला आहे. यातील महत्त्वत्या समितीपदे आम्हाला मिळाल्या आहेत. हा महाविकास आघाडीचा विजय आहे. माळशिरस येथील सहा सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षवर अविश्वास आणून, महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करणार आहे. सभापती निवडीत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आदींनी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यामुळे महाविकास आघाडीचा विजय झाला आहे.

पराभव जिव्हारी

महाविकास आघाडीतील मल्लिकार्जुन पाटील आणि शैला घोडशे या दोन सदस्यांनी वैयक्तिक मतापोटी भाजपपुरस्कृत समविचारी गटाचे नेते विजयराज डोंगरे यांना मतदान केल्यामुळे रणजित शिंदे यांचा पराभव झाला आहे. हा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आमच्या विजयानंतरही जल्लोष करणे टाळले आहे.

-उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य

Related posts: