|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पतंग तयार करण्याच्या कार्यशाळेत चिमुकले रममाण

पतंग तयार करण्याच्या कार्यशाळेत चिमुकले रममाण 

ऑनलाइन टीम  / पुणे  :

गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या ‘जीजीआयएस अथ'(प्री प्रायमरी स्कुलने)मुलांसाठी पतंग तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रहाटणी,पिंपरी चिंचवड,बावधन यासर्व ठिकाणी ही कार्यशाळा घेण्यात आली.

आपल्या हाताने तयार केलेला पतंग उंच आकाशात उडविण्याचा वेगळाच आनंद मिळणार असल्याने अतिशय उत्साहात मुलांनी व पालकांनी या आगळ्या वेगळया कार्यशाळेत सहभाग घेतला .यातूनच त्यांना कार्यानुभवाचे शिक्षण ही मिळावे याउदेशाने याचे आयोजन करण्यात आले होते.

कला शिक्षकांच्या मदतीने सहजसोप्या पद्धतीने कागदाचे पतंग बनविण्याचे तंत्र शिकवले.पतंग तयार करण्यासाठी काड्या जोडणे, योग्यरीतीने पतंगाला सजविण्यासाठी आकार देणे हे सर्व करण्यात चिमुकले रममाण झालेली पाहायला मिळाली .

आपल्याला लाभलेली सणांची संस्कृती ही यावर मात करण्याची मोठी ताकद आहे. आज या सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण माणुसकीच्या भावनेने एकत्र येतो. यातूनच मानवतेचा सकारात्मक संदेश जातो.आनंदासाठी, एकोप्यासाठी असे सण-उत्सव एकत्र साजरा करण्यावर आमचा भर असतो असे मत गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले.

Related posts: