|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भीम आर्मीप्रमुख ‘तिहार’मधून बाहेर

भीम आर्मीप्रमुख ‘तिहार’मधून बाहेर 

नवी दिल्ली :

भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी शुक्रवारी पुन्हा जामा मशिदीला भेट दिली. जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी ते तिहार कारागृहातून बाहेर पडले. दिल्ली सोडण्याच्या अटीवर आणि सभा न घेण्याच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्ली सोडण्याची अंतिम मुदत पूर्ण होण्यापूर्वी ते जामा मशिदीच्या पायऱयांवर समर्थकांसह पाहोचले होते. यावेळी त्यांनी घटनेची प्रस्तावनाही वाचली. 21 डिसेंबर रोजी जामा मशिदीत असेच आंदोलन केल्याबद्दल चंद्रशेखर यांना अटक करण्यात आली होती.

भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद यांना गुरुवारी रात्री तिहार कारागृहातून सोडण्यात आले. जुन्या दिल्लीतील दर्यागंजमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली चंद्रशेखर यांना अटक करण्यात आली होती. आझादच्या संघटनेने 20 डिसेंबर रोजी पोलिसांच्या परवानगीशिवाय नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात जामा मशीद ते जंतर-मंतर पर्यंत मोर्चा काढला. 21 डिसेंबर रोजी भीम आर्मीप्रमुखांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

 

Related posts: