|Thursday, February 20, 2020
You are here: Home » leadingnews » K-4 बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

K-4 बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

  शत्रू देशांवर आण्विक हल्ला करण्यास सक्षम असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाईलची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली.

या पाणबुडी मिसाईलला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने तयार केले आहे. या मिसाईलची 3500 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे. ओडिशाच्या किनाऱयावरील चांदीपूर येथून आंध्र प्रदेशच्या किनाऱयावर या मिसाईलची चाचणी घेण्यात आली. हे मिसाईलमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना आवाक्यात घेण्याची क्षमता आहे.

K-4 बॅलिस्टिक मिसाईलला भारतीय नौसेना स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत-श्रेणीच्या पाणबुडीत तैनात करणार आहे. ही मिसाईल जमिनीपासून हवेत मारा करून लक्ष्य भेदण्यात सक्षम आहे. तसेच शत्रूचे विमान किंवा ड्रोनवर नजर ठेवून तात्काळ त्याला लक्ष्य बनवते. भारत हा जमीन, हवा आणि पाण्यातून आण्विक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे.

अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे.

Related posts: