|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हृषीकेशी केळवला

हृषीकेशी केळवला 

भीष्मक राजा पुढे म्हणाला-माझ्या या कन्येमुळेच मला श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती झाली आणि माझे मन ब्रह्माकार झाले. चराचरात भरलेल्या भगवंताचे दर्शन झाले. कोणत्याही वंशातील कुणालाही कृष्णाचे चरण प्राप्त झाले तर कृष्णकृपेने त्याच्या पूर्ण कुळाचाच उद्धार होतो व सर्व कुळालाच वैकुंठ भुवन प्राप्त होते. यामुळे मी मोठय़ा आनंदाने भिमकीची इच्छा मान्य करीत आहे.

सेवक पाठविले नगरासी । वैभवसामग्री वेगेसीं। नगर नागरिकवासी । मूळमाधवासी आणावें । सवेंचि विनवी श्रीकृष्णासी । मूळ पाठवा जी द्वारकेसी । देवकी आणी वसुदेवासी । सोहळय़ासी आणावें । भाव जाणोनि मानसीं । संतोषला हृषीकेशी। मूळ पाठविलें द्वारकेसी । सकळिकांसी सोहळिया ।

भीष्मक राजाने आपले सेवव. कुंडिनपुरास पाठवले. त्यांना आज्ञा केली की विवाह समारंभासाठी आवश्यक सर्व उत्तम सामग्री आणि नगरातील नागरिक यांना मूळमाधव क्षेत्री आणावे. त्याने श्रीकृष्णाला विनंती केली की द्वारकेला निरोप पाठवून वसुदेव देवकीला मूळमाधव क्षेत्री विवाहासाठी बोलवावे. त्याप्रमाणे कृष्णाने द्वारकेला निरोप पाठविला.

पाचारूनी विश्वकर्म्यासी । आज्ञा दिधली मंडपासी। मूळमाधवीं अतिविशेषीं । शोभा चौपाशीं आणावी । मूळमाधवी अद्यापवरी । वृक्षमात्र मंडपाकरिं ।कृष्णआज्ञा पै तरुवरिं । अजूनिवरी पाळिजे । मूळमाधवा आला परी । शोभा देखोनि साजिरी । संतोषला श्रीहरी । निजपरिवारिं उतरला। तीर्थस्नान केलें सहजीं । मूळमाधवा माधव पूजी । पूजाविधी सांगिजे द्विजीं । पुण्यपूजीं ऋषीश्वरिं ।

भीमकी दिधली भीमकापाशीं । थोर उल्हास झाला त्यासी ।  कन्या नेली निजमंडपासी । हृषीकेशी केळवला ।  कौंडिण्यपुरिंची आइती। सकळ सामग्री संपत्ती । घेऊन आली शुद्धमती। भावें श्रीपती पूजावया। कृष्णरुक्मिणींचे देख। पाहावया विवाहसुख। नगरनागरिक लोक । आले सकळिक उल्हासें । कृष्णाने विश्वकर्म्याला बोलावले व मूळमाधव क्षेत्री उत्तम विवाहमंडप उभारण्याची आज्ञा केली. विश्वकर्म्याने तेथील वृक्ष व लता यांचीच अशी विलक्षण रचना केली त्यातून सुंदर शोभायमान विवाहमंडप उभा राहिला. त्या क्षेत्रातील लता वृक्ष आजही प्रभूची आज्ञा पाळत तसेच उभे आहेत. आपल्या परिवारासह श्रीहरी मूळमाधव क्षेत्री आला. तेथील तयारी पाहून त्याला आनंद झाला. तेथे त्याने तीर्थस्नान केले व देवतांचे पूजन केले. भीमकीला तिच्या वडिलांच्या हवाली केले. त्यांना आनंद झाला. ते रुक्मिणीला आपल्या वस्तीच्या ठिकाणी घेऊन गेले. मग श्रीकृष्णाचे केळवण झाले. कुंडिनपुराहून सर्व विवाह सामग्री घेऊन राणी शुद्धमती आली. नगराचे अनेक लोक कृष्ण व रुक्मिणीचा विवाह पहायला आनंदाने व उत्साहाने आले.

थोर उल्हास श्रीकृष्णासी । मूळें पाठविलीं रायासीं।

कुरु- सृंजय – कैकयासी । सोयरियांसी निजलग्ना । कृष्णविवाह मनोहर । पाहों आले जी सुरवर ।  शिव शांभव यक्ष किन्नर । नारदादि वैष्णव ।

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: