|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कॉफी टेस्टर म्हणून रत्नागिरीच्या सुपुत्राचे नाव सातासमुद्रापार!

कॉफी टेस्टर म्हणून रत्नागिरीच्या सुपुत्राचे नाव सातासमुद्रापार! 

केतन पिलणकर / रत्नागिरी

कॉफी म्हटले की, भारतीयांच्या जीभेवर एक वेगळीच चव उभी राहते. या उत्पादनात भारताचा जगात 5 क्रमांक लागतो. विशेष करुन कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये कॉफीचे उत्पादन घेतले जाते. कॉफी टेस्टर म्हणून देशासह परदेशात नाव कमावले आहे ते म्हणजे रत्नागिरी-माळनाका येथील अजय गिरीश रेडीज यांनी. त्यांनी भारताचे नाव सातासमुद्रापर्यंत नेले आहे. रत्नागिरीच्या सुपुत्राचे नाव जगाच्या नकाशावर आल्याची बाब जिह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.

अजय रेडीज यांना काफी टेस्टर म्हणून देशासह परदेशात खूप मागणी आह़े अजय हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेस्टर आहेच. शिवाय आंतरराष्ट्रीय तज्ञही आह़े  अजय हे कॉफीच्या सुगंध व स्वादावरुन ही कॉफी कोणत्या देशातील आहे, कोणत्या प्रकारची आहे, यात काही स्वाद वाढवण्यासाठी काही रासायनिक प्रक्रिया केली आहे का, हे अचूक ओळखत़ो त्यामुळे त्याची काफी टेस्टर म्हणून जगभरासह देशामध्ये व्यावसायिक मागणी आह़े

  आईकडून प्रोत्साहन

लहानपणापासूनच अजय यांना उपजतच कॉफी या पेयाविषयी आवड, कुतूहल होते. शिवाय आई सुवर्णा रेडीज या बनवत असलेल्या काफीच्या प्रेमात पडून अजय यांनी कॉफीच्या संशोधनासह कॉफी टेस्टर म्हणून करियर करायचे ठरवल़े  यासाठी आई सुवर्णा रेडीज यांनी अजयला प्रोत्साहन दिल़े अजय यांनी आपली जैवतंत्रज्ञानामधील पदवी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात घेऊन पुढे हैद्राबाद येथे 2 वर्ष आण्विक जैवशास्त्रात संशोधन केल़े  यानंतर अजय यांनी पेंद्र सरकारच्या, कॉफी बोर्ड बंगलोर या संस्थेचा पोस्ट ग्रुज्युएट डिप्लोमा इन कॉफी क्वॉलिटी मॅनेजमेंटसह कॉफी क्वालिटी इन्स्टीटय़ुट अमेरिका, स्पेशालिटी कॉफी असोसिएशन या संस्थेचा कॉफी टेस्टर म्हणून लागणारे अधिकृत लायसन्स मिळवले.                                               टेस्टर म्हणून कतारमध्ये सहभाग 

अजय यांनी कॉफी टेस्टर म्हणून कतार येथे झालेल्या कतार एरोप्रेस चॅम्पियनशिप स्पर्धेवेळी कॉफी टेस्टर जज् म्हणून काम पाहिले आह़े यासह भारतात दरवर्षी होणाऱया रिजनल व नॅशनल बॅरीस्टॉ चॅम्पियनशीप येथेही अजय हे दरवर्षी जजचे काम करतात़ दिल्ली, मुंबई, बेंगलोर येथे होणाऱया भारतीय एरोप्रेस चॅम्पियनशीपमध्येही ते परीक्षक म्हणून काम करतात़

भारत कॉफी निर्यातीत आघाडीवर

भारताचा कॉफी उत्पादनात जगभरात 5 वा क्रमांक लागत़ो तर पेट्रोलियम पदार्थानंतर जगभरात कॉफीची निर्यात ही 2 ऱया क्रमांकावर आह़े भारतामधील कर्नाटक येथील चिकमंगलूर, बाबाबुधानगिरी तर तामिळनाडूमधील नीलगिरी पर्वत, शिवरॉय पर्वत येथे कॉफीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत़े त्यामुळे कॉफी वेडय़ा अजय यांची ही पंढरी आह़े

देशात कॉफी उत्पादकांची स्पर्धा

कॉफी बोर्डच्या फ्लेवर्स ऑफ इंडिया फाईन कप अवॉर्ड हा कॉफी व्यावसायिकांसाठी सर्वात महत्वाचा मानला जात़ो यामध्ये देशातील कॉफी बागायतदारांची स्पर्धा आयोजित केली जात़े या स्पर्धमुळे सर्वात चांगल्या प्रतीच्या कॉफीची निवड होउढन त्या बागायतदाराची कॉफी चांगल्या किंमतीला जात़े या कॉफी निवडीच्या जुरी पॅनेलमध्ये अजय यांना दरवर्षी न चुकता बोलावण्यात येत़े  

वैज्ञानिकदृष्टय़ा ब्लॅक कॉफीला मागणी अधिक

कॉफी या पेयाला जगभरात खूप मोठी मागणी आह़े कॉफीच्या स्वाद, चव, सुगंध पोषणमूल्ये यानुसार मागणी असत़े उत्तम आरोग्यासाठी वैज्ञानिक दृष्टय़ा ब्लॅक काफी उत्तम मानली जात़े यासंबंधी काही शोधनिंबधही उपलब्ध आहेत. त्यामुळे काफीविषयी असणारे पारंपरिक गैरसमज दूर सारुन प्रत्येकाने कॉफीचे सेवन करावे, असे अजय सांगतात़  काही कॉफीच्या बीयांना ऑरेंज या फळासारखी तर काही बीयांना जास्मीन, गुलाब अशा फुलांची नैसर्गिकरित्या चव प्राप्त होत़े

चौकट करणे—

रत्नागिरीच्या सुपुत्राची सुरेश प्रभू यांच्याकडून दखल

बंगलोर येथे झालेल्या झालेल्या काफीविषयक भारतीय एरोप्रेस चॅम्पियनशीपला तत्कालीन पेंद्रीय वाणिज्य मंत्री आणि कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी भेट †िदली होती. यावेळी कॉफी जज् पॅनेलमध्ये रत्नागिरीचा अजय रेडीज असल्याचे समजताच त्यांनी त्याचे कौतुक तर केलेच शिवाय कॉफीसारख्या विषयामध्ये कोकणातील अजय यांचे ज्ञान व व्यासंग पाहून त्यांची आस्थेने चौकशी केल़ी

.

Related posts: