|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » कोरोना : राजस्थान, बिहारमध्येही दोन संशयित रुग्ण

कोरोना : राजस्थान, बिहारमध्येही दोन संशयित रुग्ण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनमध्ये 80 लोकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरस आता भारतातही पोहचला आहे. महाराष्ट्रानंतर रविवारी राजस्थानमधील जयपूरमध्ये एक संशयित रुग्ण आढळला तर बिहारमध्येही एका मुलीला हा संसर्ग माहिती मिळत आहे. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी ही माहिती दिली.

कोरोना या जीवघेण्या व्हायरसची भीती आता संपूर्ण जगभर पसरली आहे. चीनमध्ये एमबीबीएस चा कोर्स पूर्ण केल्यानंतर भारतात परतलेल्या एका राजस्थानच्या डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याला एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, या संशयीत रुग्णाच्या रक्ताचे नमुणे पुण्यातील राष्ट्रीय व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. रुग्णाच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

तर बिहारमधील छपरा येथील 22 वर्षीय तरुणी चीनमध्ये न्यूरो सायन्स मध्ये पीएचडी करत होती. ती 22 जानेवारीला भारतात परतली. तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. दोन्ही रुग्णांना आता 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Related posts: