|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुंभोजमधील एका नागरिकानेच केला स्वखर्चातून रस्ता

कुंभोजमधील एका नागरिकानेच केला स्वखर्चातून रस्ता 

कुंभोज/वार्ताहर

कुंभोज ता. हातकणंगले येथील शिवाजीनगर परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून वंचित असलेला रस्ता व गटरचा प्रश्न ग्रामपंचायत व शासकीय दरबारी मार्गी लागलेला नाही. अखेर कुंभोज गावातीलच एका ग्रहस्थाने स्व:खर्चाने हा रस्ता तयार केला आहे. रविराज जाधव यांनी स्वतःचे जवळील चाळीस हजार रुपये खर्च करून 200 मीटर रस्त्याचे खडीकरण व मुरमीकरण करून घेतले आहे. परिणामी त्यांच्या या कामामुळे सदर रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

रवी जाधव यांना याबाबत विचारले असता, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, ग्रामपंचायत यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सदर रस्त्याकडे कायम दुर्लक्षितच राहिले असल्याचे सांगितले. या रस्त्यावर वाहतूक करत असताना लहान मुलांचे अपघात व गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आपण स्वताच पैसे खर्च करून हा रस्त्यावर ती मुरमीकरण व खडीकरण करून घेतले. जाधव यांनी केलेल्या या कामाचे कुंभोज परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts: