|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » कोल्हापूर जिल्हय़ातील खासगी सावकारांवर धाडी

कोल्हापूर जिल्हय़ातील खासगी सावकारांवर धाडी 

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱया चार जनांवर मंगळवारी सहकार विभागाने धाडी टाकल्या. करवीर तालुक्यातील केर्ले, पन्हाळा तालुक्यातील सातार्डे, कोतोली येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या फार्म हाऊस, घर, पतसंसथा, सोने चांदीचे दुकान, आदी सात ठिकाणी टाकलेल्या धाडीत कोरे, स्टँम्प, सहय़ा असलेले धनादेश, खरेदी व करार दस्त आदी संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील ही धडक कारवाई करण्यात आली.

एक महिन्यापूर्वी कोल्हापूर शहरातील 16 सावकारांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. यानंतर खासगी सावकारांच्या विरोधातील तक्रारींचा ओघ वाढला होता. शंभरभर तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र  यातील बहुतांशी तक्रारी निनावी असल्याने कारवाई करण्यात अडचण होती. काही तक्रारी नावाने आल्याने मंगळवारी कारवाई करण्यात आली. यासाठी सहाय्यक निबंधकांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करण्यात आली. एका पथकात 7 अधिकारी कर्मचारी, तीन पोलीस कर्मचारी असे 63 जनांची नियुक्ती केली होती. सकाळी साडेआठ वाजनेच्या सुमारास सातही ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार ही कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी सांगितले.

कोतील येथील बजरंग बळी पाटील, राजाराम बळी पाटील, भूषण राजाराम पाटील, सज्जन बळी पाटील, तुकाराम बळी पाटील, मंगेश जयसिंग पाटील यांच्या विरोधात एक तक्रार आली होती. त्यांच्या मेडीकल्स्, सोने-चांदीचे दुकान, पतसंस्था, निवासस्थानावर केलेल्या कारवाईत 1995 ते 2005 पर्यंत जुने 43 स्टँम्प,4 खरेदी दस्त, 1 गहान खत यासह पतसंस्थेतील स्टँम्प, चेक मिळून आली. केर्ले तालुका करवीर येथील शहाजी पाटील यांच्या कारवाईत दोन कोरे धनादेश, पाच स्टँम्प पेपर, 31 संचकार पत्र मिळून आली. वडणगे येथील राजेंद विष्णू जगदाळे येथील सावकाराकडे 5 खरेदी दस्त, 1 रिकन्हेंन्स केलेला दस्त सापडून आला.

यांनी केली कारवाई

आजच्या कारवाईसाठी सात पथके तयार केली होती. सहाय्यक निबंधक अमित गराडे, मुख्यालय, प्रदीप मालगावे, कोल्हापूर शहर, बाळासाहेब पाटील, करवीर, शिरीष तळकेरी, पन्हाळा, प्रेम  राठोड, शिरोळ, अनंतराव चोपडे, शाहूवाडी, आप्पासाहेब खामकर, शाहूवाडी, सहाय्यक सहकार अधिकारी चंद्रकांत इंगवले, के. एल. ठाकरे यांचा समावेश होता.

नावाने तक्रारी द्याव्यात

तक्रारदारांनी निनावी तक्रार दिल्यामुळे कारवाईत अडचणी येत आहेत. तरी तक्रारदारांनी नावाने तक्रार करावी. त्यांचे नाव कुठेही उघड होणार नाही.

अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

यांच्यावर झाली कारवाई

बजरंग पाटील यांच्यासह सहा, कोतोली तालुका पन्हाळा

शहाजी विलास पाटील, केर्ले, तालुका करवीर

विनायक सुभाष लाड, सातर्डे, तालुका पन्हाळा

राजेंद्र विष्णू जगदाळे, वडणगे, तालुका करवीर

Related posts: