|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » ऍक्सेसरीजची देखणी मांडणी

ऍक्सेसरीजची देखणी मांडणी 

ऍक्सेसरीज फक्त लिव्हिंगरूममध्येच मांडायच्या असतात असं नाही. तर इतर खोल्यांचा विचार करून त्याप्रमाणे तिथे शोभणाऱया ऍक्सेसरीज ठेवणं संयुक्तिक ठरतं. आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीचे प्रतिबिंब ऍक्सेसरीजच्या माध्यमातून व्यतीत करण्याची संधी असते.

ऍक्सेसरीजचं महत्त्व हे सजावटीच्या योजनेनुसार ठरत असतं. काहींना ऍक्सेसरीजना जास्त महत्त्व देणंही पटत नाही. कारण ऍक्सेसरीज त्याही महागडय़ा असतील तर त्यांचा सांभाळ करणं सर्वात अवघड बाब असते. त्यातल्या त्यात मुलं घरात असतील अशा घरात ऍक्सेसरीजची जपणूक काळजीपूर्वक करणे मोठे आव्हान असते. ऍक्सेसरीज फक्त लिव्हिंगरूममध्येच मांडायच्या असतात असं नाही. तर इतर खोल्यांचा विचार करून त्याप्रमाणे तिथे शोभणाऱया ऍक्सेसरीज ठेवणं संयुक्तिक ठरतं. आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीचे प्रतिबिंब ऍक्सेसरीजच्या माध्यमातून व्यतीत करण्याची संधी असते.

अत्यंत लक्षवेधी ऍक्सेसरीजची मांडणी खोलीचं आकर्षण नक्कीच वाढवतं. पण ऍक्सेसरीजची देखभाल मात्र नियमीत करावी लागते, तरच त्या चांगल्या टिकतात, राहतात. तलम फर्निशिंग्जच्या माध्यमातून सजावट चांगली अंगीकारता येते. पडदे, रग, कुशन्स आणि सजावटी प्रकाशदिव्यांच्या माध्यमातून सजावटीला हटके लुक देता येतो. विविधरूपी शिल्पे, अजब नमुन्याच्या डिझाइन्सच्या लाकडी वस्तु, फर्निचर यांचीही भर घालता येते. प्रत्येक खोलीचं महत्त्व अधिक चांगल्या पद्धतीने दाखवायचे असल्यास योग्य आणि उठावदार ऍक्सेसरीजची मांडणी करावी लागते.

लिव्हिंगरूम- या खोलीसाठी निवडायच्या ऍक्सेसरीजही महत्त्वाच्या असतात. कारण घरात शिरल्यानंतर सर्वात आधी लागते ती ही खोली. या खोलीला नाटय़ आणणाऱया वस्तु आवश्यक असतात. सोफ्यावर उजळणाऱया रंगाच्या, आकाराच्या उशा अंथरता येतात. तिथेच एखादी रगही अंथरता येते. खोलीच्या आकारमानाप्रमाणे जमिनीवरील उपलब्ध जागा लक्षात घेऊन योग्य आकाराची रग घेतली गेली पाहिजे. एखादं डिझाइनर फर्निचर पीस असेल तर क्या कहने. भिंतीवर एखादं छानसं पेंटिंग लावता येईल. एन्ट्रन्स लॉबी असल्यास महागडय़ा लाइटस्चा वापर येथे करता येतो. शिवाय कोनाडेही विविध वस्तुंसाठी करता येतील.

बेडरूम- ही आरामाची खोली असल्याने ऍक्सेसरीजचा भरणा येथे करता कामा नये. अगदी मोजक्याच पण आकर्षक दिसणाऱया ऍक्सेसरीज येथे समाविष्ट कराव्यात. या खोलीतला महत्त्वाचा घटक हा अर्थातच पलंग असतो. त्यामुळे पलंगपोस अधिक उठावदार असायला हवा. त्यावरील उशाही वेगळय़ा धाटणीच्या असतील तर उत्तम ठरते. इथे एखादी एरीया रगही अंथरता येते. उबदारपणासाठी रग आवश्यक. इथे खासगीपणा जपण्यासाठी पडदे हे जाडसर घ्यावेत. पण हे पडदेही चांगल्यापैकी असतील हे पाहा. पडद्यांसाठी मॉडर्न स्वरूपाचे रॉडस् वापरता येतील. पलंगाशेजारी लॅम्प लावल्यास खोलीचा लुक बदलून जाईल. इथे नेहमीच्या दिव्यांबरोबरच वेगळी प्रकाशयोजना करता आली तर जरूर करावी. खोलीतल्या एका भिंतीवर आपले निवडक फॅमिली फोटो लावायला हरकत नाही. या फोटोग्राफना सोनेरी पट्टीची किनार किंवा बॉर्डर दिल्यास ते आणखीन उजळून दिसतील.

किचन-इथे स्वयंपाक करणे हे महत्त्वाचे काम असल्याने तिचा वापर लक्षात घेऊन ऍक्सेसरीजची मांडणी ठरवता येते. किती ऍक्सेसरीज इथे समाविष्ट करायच्या हेही खोलीचे आकारमान, रचना पाहून ठरवता येते. साखर, चहापावडरचा डबा किंवा कटलरी वेगळय़ा शैलीचे असावेत. कॅबिनेट हटके आणि उठावदार करण्यावर भर द्या. महागडय़ा क्रॉकरीला या कॅबिनेटमध्ये स्थान देता येतं. जागा असेल तर ब्रेकफास्ट टेबलाची मांडणी तेथे करता येते. यासाठी खुर्च्या ट्रेंडी दिसणाऱया घेता येतील. कृत्रीम रोपटय़ांची हटके आकाराची कुंडी येथे समाविष्ट करता येते.

बाथरूम- बाथरूममध्येही ऍक्सेसरीजची मांडणी करता येते. सजावटीच्या टाइल्स, काच आणि सॅनिटरी वेअर यांच्या माध्यमातून बाथरूमला सुंदरता प्रदान करता येते. येथे बसवण्यात येणारा आरसा हा सोनेरी, चंदेरी किनाराचा घेतल्यास दिसायला खूप छान दिसतो. वॉशबेसीन काऊंटरही आकर्षक आकार, रंगाचं घेतल्यास उत्तम. ऍरोमा कँडल्स, ताजी फुले आणि उठावदार फुलदाणी यांची मांडणीच बाथरूमची उंची वाढवण्यास मदत करतील.

Related posts: