|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लातूरनजीक अपघातात जत तालुक्यातील दोघे ठार

लातूरनजीक अपघातात जत तालुक्यातील दोघे ठार 

वार्तहर / माडग्याळ

जत तालुक्यातील सोरडी येथील अनिल पाटील (वय 29, रा. सोर्डी  व व्होसपेठ ता. जत) येथील बापू अंबाजी कर्वे (वय 26) यांचा सोमवारी पहाटे तीन ते साडेचारच्या दरम्यान लातूरजवळ औसा रोडवरील पुलाजवळ डंपर व पीक

अप यांच्यात समोरासमोर धडक होऊन अनिल पाटील हा पीकअपचा मालक जागीच ठार झाला. तर बापू कर्वे हा ड्रायव्हर आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान लातूर येथील दवाखान्यात मृत्यू पावला.

 याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोरडी ता. जत येथील अनिल पाटील यांच्या मालकीची बुलोरा पीकअप घेऊन व्होसपेठ येथील ड्रायव्हर बापू कर्वे हे दोघेही नागपूरला द्राक्ष विक्रीसाठी गेले होते. नागपूरहून परत येत असताना लातूरशहरा जवळ औसा रोड वरील पुलाजवळ डंपर व पीकअप यांच्यात समोरासमोर धडक होऊन जत तालुक्यातील या  दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. हे वृत्त बातमी सोरडी व व्होसपेठ येथे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह गावी आणण्यात आले.

Related posts: