|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘महाकांली, माणगंगा’ कारखान्यासह पाच संस्थांचा होणार लिलाव

‘महाकांली, माणगंगा’ कारखान्यासह पाच संस्थांचा होणार लिलाव 

प्रतिनिधी/सांगली

कोटयवधी रूपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने  इस्लामपूरची शेतकरी विणकरी सूतगिरणी, प्रतिबंब, महांकाली, माणगंगा साखर कारखाना व डिवाईन फूडस पलूस या संस्थांच्या मालमत्ता विक्रीसाठी बॅँकेने लिलाव जाहीर केला आहे. 12 मार्चपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत आहे. बडया राजकीय नेत्यांच्या संस्थांवर कारवाई करुन बॅँकेने नेत्यांना दणका दिल्याने खळबळ उडली आहे.

जिल्हा बँकेने मार्चजवळ आल्याने बडय़ा थकबाकीदार संस्थांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. बडया संस्थांकडे सुमारे एक हजार कोटींवर आहे. त्यातील बिगर शेती संस्थांकडे 600 कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे. यामध्ये टॉप व्टेंन्टी संस्थाकडेच 450 कोटींची थकबाकी आहे. यात शेतकरी विणकर सहकारी सूतगिरणी इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय को ऑप. इंडस्ट्रिज, इस्लामपूर, डिवाईन फूडस कंपनी पलूस, महांकाली साखर कारखाना कवठेमहांकाळ आणि माणगंगा साखर कारखाना आटपाडी यांच्याकडील थकित कर्जाचाही समावेश आहे.

बडय़ा संस्थांना थकीबाकी वसुलीसाठी यापूर्वी जिल्हा बॅँकेने सिक्युरिटायझेशन ऍक्टअंतर्गत नोटीस बजावत साठ दिवसांची मुदत दिली होती. मात्र या मुदतीत त्यांनी कर्ज परतफेड न केल्याने आता सिक्युरिटायझेशन ऍक्ट अंतर्गत या संस्थांचा प्रतिकात्मक ताबा घेत त्यांचा लिवाव काढला आहे. प्रतिबिंब इंडस्ट्रिजच्या मालमत्तेची राखीव किंमत 7 कोटी 25 लाख 92 हजार रूपये आहे. तर शेतकरी विणकरी सूतगिरणीची 49.05 कोटी, महांकाली कारखान्यांची 82.63 कोटी, डिवाईन फूडसची 36.11 कोटी व माणगंगा कारखान्यांची राखीव किंमत 75.94 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या पाचही संस्थांच्या स्थावर व जंगम मालमत्ता, मशिनरीसह अन्य मालमत्तेचा लिलाव होणार आहे.

लिलाव जाहीर करण्यात आलेल्या प्रतिबिंब, शेतकरी विणकरी सूतगिरणी, डिवाईन फूडस्, महांकाली व माणगंगा कारखान्यांची एकूण राखीव किंमत 251 कोटी 7 लाख 36 हजार रूपये आहे. महांकाली कारखान्यांची स्थिती वेगळी आहे. या कारखान्यांची राखीव किंमत 82.63 कोटी असली तरी प्रत्यक्षात थकबाकी 116 कोटींच्या घरात आहे. या शिवाय या पाचही संस्थांकडील व्याजाची रक्कम राखीव किंमतीत समाविष्ट नाही नाही त्यामुळे या पाच संस्थांची थकबाकी तीनशे कोटीं पेक्षा जास्त आहे. यासाठी 12 मार्चपर्यंत सिलबंद निवीदा मागविल्या आहेत. 13 मार्चला बॅँकेच्या प्रधान कार्यालयात निविदा उघडल्या जाणार आहे. पाचही संस्थांवर कारवाईसाठी बॅँकेने प्राधिकृत अधिकाऱयांची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पाच संस्थांकडे 600 कोटीची थकबाकी

महांकाली कारखाना कवठेमहांकाळ – 138 कोटी

माणगंगा साखर कारखाना, आटपाटी – 116 कोटी

शेतकरी विणकरी सूतगिरणी इस्लामपूर – 49.05 कोटी

डिवाईन फूडस कंपनी पलूस – 36.19 कोटी

प्रतिबिंब मागासवर्गीय इंडस्ट्रिज इस्लामपूर – 7.24 कोटी

Related posts: