|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सावर्डेत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

सावर्डेत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 

वार्ताहर/ सावर्डे

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आयोजित आमदार शेखर निकम राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत यांच्याहस्ते करण्यात आले.

 या स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा व जिह्यातील 32 नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे. विजेत्यास 150000 रूपये, उपविजेत्या संघाला 75000 रूपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी आमादार शेखर निकम, उद्योजक जितू शेटे, यंग बॉईज क्रिकेट क्लबचे अध्यक्ष केतन पवार, उपाध्यक्ष सचिन पाकळे, सचिव देवराज गरगटे, सावर्डेचे सरपंच बाळू मोहिरे, शांताराम बागवे, तुकाराम साळवी, विष्णूपंत सावर्डेकर, पंचायत समितीचे उपसभापती पांडू माळी, विजय गुजर, कृष्णकांत पाटील, नीलेश पाटील, संजय पाकळे, प्रशांत निकम, अशोक काजरोळकर, ओम प्रकाश भंडारी, विकास नलावडे, अजय नलावडे, समीर काझी, सतीश सावर्डेकर, जमीर मुल्लाजी, गणेश सावर्डेकर, तुषार वारे आदी उपस्थित होते.

Related posts: