|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डीप फ्रिजरचे काम ‘चांदा ते बांदा’तून

डीप फ्रिजरचे काम ‘चांदा ते बांदा’तून 

वेंगुर्ले नगरपरिषद सभेत निर्णय : विविध विकासकामांना मंजुरी

 वार्ताहर/ वेंगुर्ले

वेंगुर्ले शहरातील नगरपरिषदेच्या मच्छीमार्केटचे काम लवकरात लवकर व्हावे. त्यामध्ये आवश्यक असलेल्या डीप फ्रिजरसाठी ‘चांदा ते बांदा’ योजनेतून किंवा अन्य योजनेतून जो निधी प्रथम उपलब्ध होईल, त्या निधीतून त्याचे काम करण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, ‘चांदा ते बांदा’ योजनेतून हे प्रस्तावित काम दुसऱया निधीतून घेण्याच्या सूचनेवेळी नगरसेवक संदेश निकम यांनी थेट मत्स्य आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता या प्रस्तावाचे पैसे मंजूर असल्याचे उत्तर देण्यात येऊन त्याचे पत्र व्हॉट्ऍपवर पाठविण्यात आले. त्यामुळे संदेश निकम यांचे सभागृहातील नगरसेवकांनी अभिनंदन केले.

वेंगुर्ले नगरपरिषदेची सभा बुधवारी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर  तुषार सापळे, आत्माराम सोकटे, नागेश गावडे, प्रशांत आपटे, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शीतल आंगचेकर, कृपा गिरप-मोंडकर, पूनम जाधव, संदेश निकम उपस्थित होते.

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सर्व उपांगाकरिता नगरपरिषदेला सहाय्य करण्यासाठी एजन्सी नियुक्ती करण्याबाबत विचारविनिमय करण्यात येऊन वेंगुर्ले शहर डासमुक्त करण्यासाठी मुंबईचे सेवानिवृत्त स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून डासमुक्त मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याचे ठरले,

                संदेश निकम यांचे यशस्वी प्रयत्न

‘चांदा ते बांदा’ योजनेतून वेंगुर्ले नगरपरिषद मच्छीमार्केटमध्ये डीप फ्रिजरसाठी 7.48 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु सदर निधी अप्राप्त असल्याने सदरचे काम अन्य दुसऱया योजनेतून प्रस्तावित करण्याची सूचना मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी मांडली असता नगरसेवक संदेश निकम यांनी ‘चांदा ते बांदा’ योजना सुरू आहे. त्याच निधीतून आपण काम करून घेऊ, असे सांगत थेट मत्स्य सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला. तेथून वेंगुर्ले नगरपरिषदेच्या त्या कामाला ‘चांदा ते बांदा’ योजनेतून पैसे मंजूर असल्याचे सांगून त्याची ऑर्डरही त्या कार्यालयातून व्हॉट्ऍपवर पाठविण्यात आल्याने ते काम त्याच निधीतून करण्याचे सर्वानुमते ठरले.

तसेच वेंगुर्ले नगरपरिषद अंतर्गत म्हाडा सोसायटीमधील एल. 1 ते गावडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, म्हाडा वस्तीतील रस्त्याचे डांबरीकरणे करणे भाग 2, नगरपरिषद येथे त्रिकोणी गार्डनचे विकसन करणे, तांबळेश्वर स्मशानभूमी येथील जुनी स्मशानशेड पाडून नवीन बांधणे व पायाभूत सुविधा निर्माण करणे, नारायण तलाव रस्ता ते स्वामिनी मंगल कार्यालय ते दाभोस तिठापर्यंत असलेली अस्तित्वातील जलवाहिनी टाकणे, निमुसगा येथील पाण्याच्या टाकीपासून दाभोसवाडा तिठा ते आईस फॅक्टरीपर्यंत असलेली अस्तित्वातील जलवाहिनी बदलणे, दाभोली नाका ते एसटी स्टँड रस्ता ते सुंदरभाटले येथील असलेली अस्तित्वातील जलवाहिनी बदलणे, सांबसदाशिव मंदिर ते खांबडभटवाडी आणि किनळणे तिठा येथील असलेली अस्तित्वातील जलवाहिनी बदलणे अशा विकासकामांना या सभेत मुदतवाढ देण्यात आली.

एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेसकडून आवश्यक उर्वरित एलईडी दिवे खरेदी करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. रायफल शूटिंग हॉल, टेनिस टेबल हॉल व टेनिस, कॅरम हॉल यांचा वापर शहरातील खेळाडूंना होणार असल्याने कमीत कमी भाडे आकारून तिन्ही हॉलचा वापर खेळाडूंसाठी लवकरात लवकर करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच कॅम्प येथील नगरपरिषदेचा व्यायामशाळा हॉल हा फायदा कमविण्याचा उद्देश न ठेवता व्यायामाची सवय वाढीस लागावी, या उद्देशाने मागील भाडे कायम करत पुढील तीन वर्षासाठी देण्यास मंजुरी देण्यात आली.

        

Related posts: