|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » रितेश-जेनेलिया घेणार माजी मुख्यमंत्र्यांची सपत्नीक मुलाखत

रितेश-जेनेलिया घेणार माजी मुख्यमंत्र्यांची सपत्नीक मुलाखत 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख हे राजकारणातील एका मोठय़ा व्यक्तीची सपत्नीक मुलाखत घेणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत ते घेणार आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने नांदेडमध्ये आयोजित ‘आनंदाचे डोही’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत घेतली जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने हा कार्यक्रम 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.

या विशेष मुलाखतीमध्ये दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण कौटुंबिक आयुष्यात कसे होते? मुलांना आणि नातवंडांना त्यांनी काय शिकवण दिली, कोणते संस्कार दिले अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

 

Related posts: