|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » संवाद » व्हॅलेंटाईन डेचा इतिहास

व्हॅलेंटाईन डेचा इतिहास 

रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणाऱयांचाही त्याला राग यायचा.

संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर जडला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ’युअर व्हॅलेंटाइन’ असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे.

सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरूवात झाली 496मध्ये. प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली. रोमनमध्ये फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतुची सुरुवात.

सेलिब्रेशनचा भाग म्हणून, मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समधून काढतात. त्यानंतर या फेस्टिवलदरम्यान, ते दोघं गर्लप्रेंड बॉयप्रेंड असतात आणि नंतर त्यांना वाटलं तर ते एकमेकांशी लग्न देखील करू शकतात. त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल संत
 व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत ख्रिचन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.

पण कालांतराने, संत
व्हॅलेंटाइनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली.

Related posts: