|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » नगर : अनैतिक संबंधाचे व्हिडिओ पाहिल्याने पत्नीला जिवंत जाळले

नगर : अनैतिक संबंधाचे व्हिडिओ पाहिल्याने पत्नीला जिवंत जाळले 

 नगर / प्रतिनिधी :

  पतीच्या अनैतिक संबंधाचे व्हिडिओ पत्नीने पाहिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीलाच जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  हिंगणघाट येथील जळीतकांडाचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरा येथे ही घटना घडली. शंकर दुर्गे असे या आरोपीचे नाव आहे. शंकरचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. या महिलेबरोबरच्या अनैतिक संबंधाचे व्हिडिओही त्याने बनवले होते. शिवाय दोघांचे फोटोही काढले होते. मात्र, हे व्हिडिओ डिलिट करण्यास तो विसरला. नेमका त्याच्या पत्नीच्या हातात त्याचा मोबाईल लागला. त्याच्या पत्नीने हे सर्व व्हिडिओ पाहून त्यानंतर त्याला जाब विचारला असता शंकर बिथरून गेला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले. त्यामुळे आपले बिंग नातेवाईकांसमोर आणि शेजाऱयांसमोर फुटण्याची भीती वाटल्याने संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले आणि पसार झाला.

 

Related posts: