|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘वाजवूया बॅन्ड बाजा’तून रुचिता घोरमारेचे मराठी चित्रपटात पदार्पण

‘वाजवूया बॅन्ड बाजा’तून रुचिता घोरमारेचे मराठी चित्रपटात पदार्पण 

ऑनलाईन टीम / पुणे :

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘वाजवूया बॅन्ड बाजा’ या चित्रपटातून अभिनेत्री रुचिरा घोरमारे मराठी चित्रपटात पदर्पणासाठी सज्ज झाली आहे. रुचिताने याआधी इम्तियाज अली आणि आरिफ अली यांच्या ‘लव आज कल’ या शॉर्टफिल्म मधून काम केले आहे.

याशिवाय आगामी काळात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘बोले चुडियां’ या बॉलिवूड सिनेमातही रुचिरा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मूळची नागपूरची असलेल्या रुचिराने अभिनेत्री होण्याआधी, इंडस्ट्रीतल्या सर्वोत्तम दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव घेतला. रुचिराने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मुक्काबाज’ या सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

त्यानंतर, रुचिरा आता मराठी सिनेमासाठी सज्ज झालीय. सिनेमातल्या अनुभवाबद्दल रुचिरा सांगते, ‘मी या सिनेमाबद्दल खूपच उत्साही आहे. शिवाजी सरांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. सर्वांना माझं काम आवडेल अशी अपेक्षा आहे.’

‘वाजवूया बँड बाजा’ या सिनेमाची निर्मिती अमोल कांगणेनी केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिवाजी लोटन पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात समीर धर्माधिकारी, मंगेश देसाई , चिन्मय उदगीरकर आणि प्रीतम कांगणे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Related posts: