|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » ‘व्हॅलेंटाइन डे’ लाच प्रेमविरोधी शपथ

‘व्हॅलेंटाइन डे’ लाच प्रेमविरोधी शपथ 

ऑनलाईन टीम / अमरावती : 

व्हॅलेंटाईन डे हा जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तरुण-तरुणी प्रेमाच्या आणाभाका घेतात.. पण व्हॅलेंटाइन डे च्या या खास दिवशी अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थिनींना वेगळीच शपथ देण्यात आली. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा निश्चय विद्यार्थिनींनी केला.

अमरावती जिह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ दिली आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ही शपथ घेतली, अशी चर्चा आहे.

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱया घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱया मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱया सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसंच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते.

 

Related posts: