|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सचिन तेंडुलकरने सांगितले, त्याचे पहिले प्रेम…

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सचिन तेंडुलकरने सांगितले, त्याचे पहिले प्रेम… 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

संपूर्ण जगभरात आज व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा केला जातो. अनेकजण आपल्या प्रेमाची कबुली आजच्या या खास दिवशी देतात. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील सर्वांना त्याच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगितले.

सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओद्वारे व्हॅलेंन्टाइन डे दिवशी त्याच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगितले आहे. 11 सेकंदाच्या या व्हिडिओत सचिन नेटमध्ये फलंदाजी करत आहे. सचिनचे पहिले प्रेम कोणती व्यक्ती नसून तर क्रिकेट आहे. भारताकडून 16 व्या वषी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया सचिनने जवळ जवळ 24 वर्ष देशाचे प्रतिनिधित्व केले.

दोन पेक्षा अधिक दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱया सचिन तेंडुलकरने 100 शतकं केली आहेत. धावांच्याबाबत पण सचिन अव्वल स्थानावर आहे.

 

Related posts: