|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » …त्यापेक्षा ‘मी मुलींना त्रास देणार नाही, अशी शपथ मुलांकडून घ्या : पंकजा मुंडे

…त्यापेक्षा ‘मी मुलींना त्रास देणार नाही, अशी शपथ मुलांकडून घ्या : पंकजा मुंडे 

ऑनलाईन टीम / अमरावती : 

आज प्रेमाचा दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सर्वजण आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. पण, अमरावतीच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनींना आज ‘मी प्रेम आणि प्रेमविवाह करणार नाही,’ अशी शपथ देण्यात आली.

त्यावर आता माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मुलींकडून अशा शपथा घेण्यापेक्षा ‘मी मुलींना त्रास देणार नाही, अशी शपथ मुलांकडून घ्यायला हवी.

पंकजा मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे, हा विचीत्र प्रकार घडला आहे. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची… त्या पेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही. वाकडय़ा नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार.

 

Related posts: