|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » leadingnews » पुलवामाच्या वर्षपूर्तीला पाकचा गोळीबार, एक जण ठार

पुलवामाच्या वर्षपूर्तीला पाकचा गोळीबार, एक जण ठार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पुलवामा हल्ल्याची आज वर्षपूर्ती असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसं उत्तर दिलं. पण पाकच्या गोळीबारात एक नागरिक ठार झालाय. तर चार जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, पुलवामामध्ये गेल्या वषी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांची बस उडवली होती. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या जवानांना भारतात आदरांजली वाहण्यात येत असताना पाकने मात्र पूंछमध्ये गोळीबार केला.

तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यब पाकिस्तानच्या दौऱयावर आहेत. पाकिस्तानसाठी काश्मीर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढचं तुर्कीसाठीही आहे, असं वादग्रस्त वक्तव्य तय्यब एर्दोगान यांनी केलंय. यापार्श्वभूमीवर पाक सैन्याने हा गोळीबार केल्याने तणाव वाढू शकतो.

 

 

Related posts: