|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » बाकनूरजवळ गोवा बनावटीची दारु जप्त

बाकनूरजवळ गोवा बनावटीची दारु जप्त 

अबकारी विभागाची कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

बाकनूरजानेवाडी रोडवर शुक्रवारी सकाळी अबकारी अधिकार्‍यांनी गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त केला आहे. गुडस् टेम्पोसह 2 लाख 67 हजार 900 रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.

यासंबंधी तुडये येथील रामलिंग मोहन शहापूरकर (वय 37, रा. तुडये, ता. चंदगड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून नंबर प्लेट नसलेली एक गुडस् टेम्पो व 267 लीटर गोवा बनावटीचा दारु साठा जप्त करण्यात आला आहे.

अबकारी विभागाचे सहआयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त बसवराज संदिगवाड यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक आर. बी. होसळळी व त्यांच्या सहकार्‍यांनी शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन रामलिंगला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Related posts: