|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडमुडशिंगीमध्ये आठ किलो गांजा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

गडमुडशिंगीमध्ये आठ किलो गांजा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल 

वार्ताहर / उचगांव

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. रमेश संभाजी हिरवे (वय 25, रा. सोनकट्टाशेजारी गडमुडशिंगी) व स्वप्निल बाळू परळे (वय 25, रा प्रियदर्शनी कॉलनी, बाबानगर उचगाव) या दोघांकडून 8 किलो गांजा व दोन हँडसेट असा 61 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गडमुडशिंगी येथील आर. बी. पाटील सहकारी कारखान्यानजीक केली.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकास हिरवे व परळे हे दोघे गांजा विक्री करत असताना रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून आठ किलो गांजा व दोन हँडसेट मिळून 61 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक फौजदार सुनील दत्तात्रय इंगवले यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे

Related posts: