|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हजरत निजामुद्दीन मार्गावरील रेल्वे रद्द

हजरत निजामुद्दीन मार्गावरील रेल्वे रद्द 

 

बेळगावच्या प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता

 बेळगाव / प्रतिनिधी

   बेळगाव, वास्को, हुबळी, बेंगळूर येथून दिल्ली, चंदिगड या मार्गावर धावणार्‍या रेल्वे दुरूस्तीच्या कारणाकरिता काही दिवस रद्द करण्यात आले आहेत. फरिदाबाद हजरत निजामुद्दीन पलवाल या मार्गावर नॉन इंटर लॉकिंगचे काम करण्यात येत असल्यामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली आहे.

  वास्को दी गामा हजरत निजामुद्दीन (रेल्वे क्र. 12779) या मार्गावर धावणारी गोवा एक्स्प्रेस 24, 25 26 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. हुबळीहजरत निजामुद्दीन (रेल्वे क्र. 17305) मार्गावर धावणारी लिंक एक्स्प्रेस 24, 25 26 रोजी रद्द करण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीनवास्को द गामा गोवा एक्स्प्रेस (रेल्वे क्र. 12780) व हजरत निजामुद्दीन हुबळी लिंक एक्स्प्रेस 26, 27 28 रोजी रद्द करण्यात आली आहे.

  यशवंतपूरचंदीगड एक्स्प्रेस (रेल्वे क्र. 22685) ही रेल्वे दि. 26 रोजी रद्द करण्यात आली आहे. चंदीगड यशवंतपूर (रेल्वे क्र. 22686) ही रेल्वे 29 रोजी रद्द करण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीन यशवंतपूर एक्स्प्रेस (रेल्वे क्र. 12650) ही रेल्वे 1 2 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूरहजरत निजामुद्दीन (रेल्वे क्र. 12629) ही रेल्वे 27 फेब्रुवारी तर यशवंतपूरहजरत निजामुद्दीन (रेल्वे क्र. 12649) ही रेल्वे दि. 28 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांचे होणार हाल

  गोवा, हुबळी, बेंगळूर व बेळगाव भागातून उत्तर भारतात जाण्याकरिता या रेल्वे उपयुक्त ठरतात. परंतु या रेल्वे काही दिवसांकरीता रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना इतर मार्गाचा वापर करावा लागणार आहे. काही जणांनी यापूर्वीच बुकींग केले असून त्यांना याचा फटका बसणार आहे. बेळगावमधून दररोज दिल्लीला लष्कराचे जवान व अधिकारी जात असतात. त्यांनाही याचा फाटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related posts: