|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मिरकरवाडा बंदर प्रदुषणाच्या विळख्यात

मिरकरवाडा बंदर प्रदुषणाच्या विळख्यात 

 ‘प्रदूषण’ महामंडळाकडून नगर परिषद, कंपन्यांना नोटीस

प्रतिनिधी/ रत्नागिरी

विविध कपन्यांकडून सोडले जाणारे प्रक्रियाविरहीत सांडपाणी व रसायनांमुळे रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील पाणी दुषित झाले आहे. याप्रकरणी पाहणी केल्यानंतर नगर परिषदेसह संबंधीत कंपन्यांना नोटीस नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक प्रदुषण अधिकारी इंदिरा गायकवाड यांनी दिली.

मिरकरवाडा बंदरामध्ये मुख्य जेटीबरोबर अनेक उपजेटी आहेत. या भागात काळे पिवळे पाणी दिसत असून प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या प्रदुषणामुळे अनेक जलचर मृतावस्थेत पडलेले दिसतात. याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे आलेल्या तक्रारीनुसार काही महिन्यांपुर्वीच या पाण्याचे नमुने तपासणासाठा पाठवण्यात आले. या तपासणीत जेटी परिसरातील पाणी पुर्णतः दुषित असल्याचे स्पष्ट झाले होते. तसा अहवालही वरीष्ठ कार्यालयात पाठवून नगर पालिका आणि शहरातील अनेक छोटय़ा-मोठय़ा उद्योगांना प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोटिसा दिल्या होत्या.

या कारवाईनंतर मिरकरवाडा बंदरातील पाणी प्रदुषणाचा विळखा कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र दिवसेंदिवस हे प्रदुषण वाढतच चालल्याने ही चिंतेची बाब बनल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शहरातील मोठय़ा प्रमाणातील सांडपाणी व उद्योग व कंपन्यांमधील कोणतीही प्रक्रिया न करता सोडलेले दुषीत सांडपाणी बेकायदेशीरपणे मिरकरवाडा बंदरात सोडले जात असल्याने ही समस्या गंभीर बनत चाली आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी समुद्रात सोडावे किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारावा अशा सूचना प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.  नगरपरिषद आणि शहरातील मोठे आणि छोटय़ा उद्योगांना या नोटीस पाठवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

 

केवळ पाच कर्मचाऱयांवरच कारभार

रत्नागिरी उपप्रादेशिक प्रदुषण महामंडळाच्या कार्यालयात सध्या शिपायासह केवळ 5 कर्मचारी कार्यरत आहेत. रिक्त जागा अनेक वर्षे भरल्याच नसल्याने उपलब्ध कर्मचाऱयांवर ताण पडत आहे. विविध कंपन्यांना व प्रदुषीत ठिकाणांना  भेटी देवून अहवाल तयार करण्यापर्यंतची जबाबदारी उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱयांवरच पडत आहे. त्यामुळे रिक्त जागा तातडीने भरणे गरजेचे आहे.

Related posts: