|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘व्हेलंटाईन डे’ उत्साहात साजरा

‘व्हेलंटाईन डे’ उत्साहात साजरा 

प्रतिनिधी/ सातारा

‘प्रेमाचा दिवस’ म्हणून ओळखला जाणारा व्हेलंटाईन डे शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला.  अलिकडे भारतात युवकांमध्ये या डे ची मोठी क्रेझ पहावयास मिळाली. अनेकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आठवडय़ापासुन सुरू झालेल्या व्हेलेंटाइन्स वीकची सांगता झाली. विशेषत: तरूण वर्गांमध्ये या दिवसाचे मोठे आकर्षन पहावयास मिळाले.

काहींनी व्हॉटस्ऍप, फेसबुक, ट्वीटर सारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर काहींनी हा दिवस आणखीनच खास बनविण्यासाठी गुलाबची फुले, चॉकलेट, भेटवस्तु देऊन आपल्या प्रिय व्यक्तीं सोबत हा व्हेलेंटाईन डे साजरा केला. त्याचबरोबर काही दांपत्त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी त्यांचा आवडता खाद्यपदार्थ तयार करून मन त्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काहींनी स्वत: कविता, चारोळी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन लिहुन आपले प्रेम व्यक्त केले. तसेच काहींनी तर आपल्या जोडीदाराबरोबर एकांतांत हा दिवस साजरा करण्याचे ठरविले. त्यामुळे जिल्हय़ातील काही पर्यटन स्थळांवर प्रेमी युगुल दिसत होते.

या संपुर्ण आठवडय़ामध्ये चॉकलेट डे, टेडी डे, रोज डे असे विविध डे असल्याकारणाणे गिफ्ट शॉपीच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी युवक-युवतींची गर्दी पहावयास मिळाली. त्यामुळे या गिफ्ट शॉपीच्या दुकानांमध्ये देखिल विविध आकर्षक नवनवीन वस्तु विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. यंदा गुलाबांच्या फुलांपेक्षा गिफ्ट खरेदी करण्याकडे अधिक कल दिसला. त्यामुळे अन्य कोणाला होऊ न होऊ विक्रेत्यांना मात्र या व्हेलेंटाइन्स विकचा नक्कीच फायदा झाला.

 पण सध्या या व्हेलंटाईन डे ची व्याख्या थोडी बदलत चालल्याची दिसली, फक्त प्रेमी युगुलच नाही तर, पती-पत्नीमधील प्रेम, मुलांचे आपल्या आई-वडीलांबाबतचे प्रेम, विद्यार्थ्यांचे आपल्या शिक्षकांबाबतचे प्रेम, मित्र-मैत्रिणींचे प्रेम, आपण ज्यांना आपले आदर्श मानतो त्यांच्या बद्दलचे प्रेम या दिवशी व्यक्त होताना दिसले. त्यामुळे केवळ प्रेमी युगुलांमध्येच नाही तर इतर वर्गांमध्ये देखिल विविध प्रकारे हा दिवस साजरा करण्यात आला.

Related posts: