|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘खाकी’ ने मागितली लाच

‘खाकी’ ने मागितली लाच 

प्रतिनिधी/ सातारा

रहिमतपूर (ता. कोरेगाव) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जगदीश जयसिंग (रा. अंगापूर, ता. सातारा) याने प्रतिबंधक कारवाईत मदत करण्यासाठी तक्रारदाराला 12 हजार रुपयांची लाच मागितल्याने त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेली माहिती अशी,  एका तक्रारदाराच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुह्यामध्ये व प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी पोलीस नाईक जगदीश कणसे याने तक्रारदाराकडे 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पथकाने 8 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने जयसिंग कणसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक राजे, खरात, वायदंडे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाणे, नंतर सातारा शहर पोलीस ठाणे आणि रहिमतपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाचप्रकरणात अडकल्याने पोलीस दलाच्या कामात सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related posts: