|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत हिंदु संघटनांची ‘शिकारा’ चित्रपटाविरूध्द निदर्शने

वास्कोत हिंदु संघटनांची ‘शिकारा’ चित्रपटाविरूध्द निदर्शने 

प्रतिनिधी/ वास्को

काश्मीरवर आधारीत असलेल्या ‘शिकारा’ या चित्रपटात वस्तुस्थीतीचे चित्रण न करता काश्मीरी पंडितांवर अन्याय करणारा विरोधाभास दाखवण्यात आल्याच्या निषेधार्थ वास्को शहरात शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रीय हिंदु आंदोलन व हिंदु जनजागृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांच्या स्मृती दिनानिमित्त शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

 विधु विनोद चोप्रा यांनी काश्मिरी हिंदूच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शिकारा या चित्रपटाव्दारे केल्याचा आरोप करून हिंदु व राष्ट्रीय विचारसरणीच्या लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार टावा असे आवाहन या निदर्शनांवेळी करण्यात आले. वास्को शहरातील जोशी चौकात या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रपटात काश्मीरी पंडितांवर कशाप्रकारे अन्याय झालेला आहे याची सविस्तर माहिती यावेळी वक्त्यांनी दिली. ज्या काळातील घटनांवर हा चित्रपट आधारीत आहे. त्या काळात झालेला हिंदुंची घरेदारे, मंदिरे यांचा विध्वंस असे काही झालेलेच नाही असे या चित्रपटात भासवण्यात आल्याचे स्पष्ट करून व्यक्त्यांनी चित्रपट निर्मात्याची निंदा केली.

या निदर्शनांच्या वेळी सत्यविजय नाईक, सुमन शर्मा, निखिल शर्मा, अविनाश तिवारी व इतर मान्यवरांनी विचार मांडले.

Related posts: