|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इदलहोंडजवळ रेल्वेखाली अनोळखीचा मृतदेह

इदलहोंडजवळ रेल्वेखाली अनोळखीचा मृतदेह 

प्रतिनिधी/बेळगाव

इदलहोंड जवळ रेल्वे रुळाशेजारी अनोळखीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा घातपात झाला असावा, असा संशय असून रेल्वे पोलिसांनी सुमारे 30 वषीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

शुक्रवारी ही घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाचे दोन तुकडे झाले आहेत. 5.5 फूट उंची, काळसर वर्ण, अंगाने सुदृढ असे त्याचे वर्णन आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच्या खिशात आढळून आलेल्या दोन मोबाईल क्रमांकांवर त्याची ओळख पटविण्यात येत आहे.

शुक्रवारी रात्री उपलब्ध झालेल्या माहितीनुसार तो बेडरहट्टी (ता. खानापूर) येथील राहणारा असावा, असा संशय आहे. त्याच्या कुटुबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतरच या संबंधीची अधिक माहिती मिळणार आहे. त्याचा घातपात करून त्याला रेल्वेखाली टाकून देण्यात आले आहे की त्याच्याबाबत आणखी काही घडले आहे? याचा तपास करण्यात येत आहे.

Related posts: