|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी तहसील कार्यालयाची कामगिरी सुसाट

निपाणी तहसील कार्यालयाची कामगिरी सुसाट 

प्रतिनिधी/  निपाणी

अवघ्या दोन वर्षांपूर्वी निपाणी तालुका अस्तित्वात आल्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयाने प्रशासकीय कामकाजात बरीच सुधारणा केल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हय़ातील अन्य तालुक्मयांच्या तुलनेत निपाणी तहसील कार्यालयाची प्रशासकीय कामगिरी सरस ठरली आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱयांसह वरि÷ अधिकाऱयांनी नुकतेच जिल्हास्तरीय बैठकीत कौतुक केले.

मार्च 2018 मध्ये तालुका अस्तित्वात आल्यानंतर निपाणीत दोन वर्षात सहा तहसीलदार झाले. त्यामुळे याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार की काय? असे चित्र निर्माण झाले होते. मात्र गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये येथील तहसील कार्यालयाने कात टाकल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यालय विस्तार करण्याबरोबरच निवडणूक विभाग, अन्न निरीक्षक कार्यालय आदी कार्यालये सुरू झाली. यानंतर लोकाभिमुख सेवा देण्यासाठी येथे गतीने पावले उचलण्यात आली.

नागरिकांचा वेळ व पैसा वाया जाऊ नये, तसेच लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे मिळावीत, यासाठी शासनाने सकाल योजना लागू केली. त्यानुसार प्रत्येक कागदपत्रे ठराविक मुदतीत देण्यात येतात. त्या मुदतीत कागदपत्रे न मिळाल्यास संबंधित अधिकाऱयाला दंड द्यावा लागतो. निपाणी तहसीलदार कार्यालयात मात्र बहुतांशी कागदपत्रे मुदतीपूर्वीच उपलब्ध करून दिली जात आहेत. तसेच शेत जमिनीसंदर्भात वारसा, नावे कमी करणे आदी विविध कामे करण्यासाठी तीन ते चार महिने कालावधी लागत होता. मात्र आता 45 दिवसांपूर्वीच सदर कामे पूर्ण होत आहेत. याशिवाय शेतजमिनी संदर्भातील प्रलंबित दाव्यांची संख्या 260 इतकी होती. मात्र तीन महिन्यात यापैकी दोनशेहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.

गेल्यावषी निपाणी भागात महाप्रलंयकारी असा महापूर आला. यावेळी निपाणी तालुक्मयात घरांबरोबर पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्याचा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यात अन्य तालुक्मयांच्या तुलनेत निपाणीची कामगिरी सरस झाली असल्याचे वरि÷ अधिकाऱयांनी बैठकीत सांगितले. सध्या रब्बी हंगामातील पिकांचा सर्व्हेही केवळ आठ दिवसात 80 टक्के इतका पूर्ण झाला आहे. यामध्ये बेळगाव जिल्हय़ात निपाणी तहसील कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. एकूणच अवघ्या दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या निपाणी तालुका तहसीलदार कार्यालयाने जिल्हय़ातील 14 तालुक्मयांमध्ये प्रशासकीय कामकाजात केलेली प्रगती कौतुकास्पद ठरली आहे.

Related posts: