|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » महावितरण : वीजचोरीचा 50 हजार कोटींचा घोटाळा उघड

महावितरण : वीजचोरीचा 50 हजार कोटींचा घोटाळा उघड 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

मागील आठ ते दहा वर्षात विविध रिसॉर्ट आणि ऍम्युझमेंट पार्कने आकडय़ांची फेरफार करून अंदाजे 50 हजार कोटींची वीजचोरी केली आहे. ही वीजचोरी रोखण्यात महावितरणला अपयश आल्याने महावितरणने ग्राहकांच्या बिलांमध्ये फेरफार करत अंदाजे 50 हजार कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीजदरवाढ याचिकेवर सुनावणी करताना व वाढीचे नवे वीजदर लागू करण्यापूर्वी या संबंधीची माहिती घ्यावी, अशी मागणी वीजग्राहक प्रतिनिधींनी केली आहे.

मागील दहा वर्षांपासून होणारी वीजचोरी रोखण्यात अपयश आल्याने वीज नियामक आयोग महावितरणला धारेवर धरत होते. त्यावर तोडगा म्हणून महावितरणच्या अधिकाऱयांनी मीटरमध्ये नोंद नसलेल्या कृषिपंपाचा वीज वापर अधिक दाखवत नुकसान कमी दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कंपनीला अधिक अनुदान मिळत आहे, तर दुसरीकडे मीटरमध्ये नोंदणी होत असलेल्या कृषिपंपांना वाढीव वीज बिल पाठवून महावितरणचे अधिकारी आकडय़ांची फेरफार करत होते, असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या एका पदाधिकाऱयाने केला आहे.

ग्राहकांच्या अतिरिक्त वीज बिलांबाबत तोडगा काढण्याच्या उद्देशाने आणि गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने जानेवारी महिन्यात अहवाल दिला.

 

 

Related posts: