|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » नाराज पंकजा मुंडेंची पक्षाकडून दखल, मिळणार आमदारकी?

नाराज पंकजा मुंडेंची पक्षाकडून दखल, मिळणार आमदारकी? 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

विधानसभा निवडणूकीपासून पक्षावर नाराज असणाऱया भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार आहे. भाजपकडून त्यांना विधन परिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

याबाबत राज्यात भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून सुरू होणाऱया पक्षाच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत बीडच्या परळी मतदारसंघात पंकजा यांना पराभवाचा स्विकारावा लागला. त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनीच त्यांना पराभूत करत विधानसभा गाठली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना निर्माण झाल्यानं पंकजा पक्षावर नाराज आहेत.

त्यामुळे आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात विधन परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्या जागा भरण्यासाठी विविध पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच पंकजा मुंडेचा संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायचा सत्ताधाऱयांना रोखण्यासाठी असं भाजपामधल्या नेत्यांना वाटतं.

 

 

 

Related posts: