|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » नागपूर : बस-कंटेनर अपघातात 6 जण ठार

नागपूर : बस-कंटेनर अपघातात 6 जण ठार 

ऑनलाईन टीम / नागपूर : 

नागपूर-भंडारा महामार्गावर लग्नाचे वऱहाड घेऊन निघालेली बस रस्त्यात उभ्या कंटेनरला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्वजण नागपूरच्या गांधीबाग पोलीस क्वार्टरमधील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता.

बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने बसच्या काचांचा चक्काचूर झाला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर काचांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र, या अपघातामुळे नागपूर-भंडारा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

 

Related posts: