|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल : ‘हे मले सैन नाई होत’…

अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल : ‘हे मले सैन नाई होत’… 

अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…

ऑनलाईन टीम / मुंबई : 

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने इंग्रजी गाणे गायले आहे. त्यांनी हे नवे गाणे ट्विटरवर शेअर केले आहे.

दरम्यान, ‘हॅलो’ असे त्या गाण्याचे शीर्षक असून, ‘लिओनेल रिची’ याचे ते मूळ गाणं आहे. अमृता यांनी हे गाणं खूप सुंदर आणि सुरेल आवाजात गायलं आहे. असं असलं तरी नेटकऱयांनी मात्र त्यांना ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्संनी अमृता यांच्या गाण्याची खिल्ली उडवली आहे.

एका युजरने म्हटले आहे ‘हे मले सैन नाई होत.’ नाळ चित्रपटातील श्रीनिवासच्या फोटोसह हा डायलॉग स्क्रीनशॉट करून शेअर केला आहे. तर दुसऱया युझरने म्हटले आहे-‘अमृता यांचे गाणं रानू मंडला यांच्यापेक्षा चांगलं आहे.’

 

Related posts: