|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रॉयल्टी भरलेले खनिज निर्यातीस हिरवा कंदील

रॉयल्टी भरलेले खनिज निर्यातीस हिरवा कंदील 

प्रतिनिधी/ पणजी

रॉयल्टी भरलेला खनिजमाल उचलून तो निर्यात करण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला असून खाणग्रस्तांच्या कर्जात सूट देण्याच्या योजनेस 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. पडून असलेला खनिजमाल सुमारे 20 मिलीयन टन असा अंदाज असून रॉयल्टी भरल्यानंतर तो निर्यात करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्यातील 1985 कंत्राटी कामगारांना लेबर सोसायटीत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. समुद्रकिनारा साफसफाई कंत्राटात काही नियम दुरस्ती करण्याचे ठरविण्यात आले असून गोवा निर्यात धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. जुलै महिन्यात गोवा सरकारने सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने म्हादईचा विषय संपलेला नाही. तो निकाल कर्नाटकाच्या बाजूने नाही आणि त्या न्यायालयाचा निकाल गोव्याच्या बाजूने लागणार अशी खात्री त्यांनी दिली.

Related posts: