|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Automobiles » ‘REVOLT 400’ च्या किंमतीत वाढ

‘REVOLT 400’ च्या किंमतीत वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुणे आणि दिल्लीतील उत्तम प्रतिसादानंतर ‘Revolt 400′ या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

मायक्रोमॅक्स या कंपनीचे मालक राहुल शर्मा यांनी ही कंपनी सुरु केली आहे. पुणे आणि दिल्लीतील बाईकच्या यशानंतर आता ही बाईक चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इतर शहरांमध्ये बाईक लाँच करण्यापूर्वीच कंपनीने बाईकच्या किंमतीत वाढ केली आहे.

‘Revolt 400′ या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 98 हजार 999 रुपये होती. ती आता 1 लाख 3 हजार 999 रुपये झाली आहे. याशिवाय बाईकच्या बुकिंगसाठी 3 हजार 999 रुपये आणि इन्शुरन्स, रजिस्ट्रेशनचे वेगळे पैसे द्यावे लागतील.

या बाईकचा जास्तीतजास्त वेग 85 किमी आहे. एकदा चार्जिंग केल्यावर ही बाईक 156 किमी धावते. या बाईकमध्ये काढता येणारी बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय एलईडी लाइटिंग, फुल्ली डिजिटल डॅश आणि 4 जी कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे.

Related posts: